आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:प्राणघातक हल्ला करणारे दोन जण पोलिसांच्या जाळ्यात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वराहच्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून यात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शहरालगत असलेल्या गोदणी बायपास चौफुली मार्गावर २६ ऑगस्टला सायंकाळी ६ घडली होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी प्रथम रितीक चिंडाले आणि यश सुनगत या दोघांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर गुरुवारी ओम सलाम (२०) रा. नवीन उमरसरा आणि सुरज गातोडे (१८) रा. जगत मंदिरजवळ, उमरसरा अशी त्या दोघांची नावे असून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील तारपूरा येथील सुनील कैतवास याचा वराह विक्रीचा व्यवसाय आहे. २६ ऑगस्टला सुनील आणि त्याचा भाऊ सानू कैतवास दोघेही सायंकाळी त्यांचे वराह पकडून तारपुरा येथील घराकडे दुचाकीने घेवून येत होते. यावेळी गोदणी बायपास मार्गावर अचानक एका चारचाकी वाहनाने कैतवास त्यांच्या दुचाकीला धडक देत खाली पाडले. चारचाकी वाहनातून रितीक चिंडाले, यश सुनगत यांच्यासह पाच जण हातात चाकू, तलवार, लोखंडी पाईप, घेवून उतरले. त्यानंतर सुनील आणि सोनू यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...