आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मुरूम वाहतूक:एसएमएस कंपनीचे दोन टिप्पर पकडले

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या कामासाठी अवैध मुरुमाची वाहतूक करणारे एसएमएस कंपनीचे दोन टिप्पर दिग्रस ते मानोरा मार्गावरील रामनगर जवळ ओव्हरलोड वाहतूक करतांना आढळून आले. त्यावरून महसूल विभागाने तपासणी करण्यासाठी थेट दोन्ही टिप्पर थांबवून कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावले. अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

रेल्वेच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाची वाहतूक करण्यासाठी एसएमएस कंपनीचे दोन टिप्पर अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक करीत होते. अशात पुसद उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिक के. एन., तहसीलदार सुधाकर राठोड यांना शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान निदर्शनास आले.

दरम्यान, तपासणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी दोन्ही टिप्पर पकडून दिग्रस तहसिल कार्यालयात लावून कारवाई केली. ही कारवाई पुसद उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिक के. एन, तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी जी. पी. गुल्हाने, बाळू इंगोले, आर. पी. काळे यांनी केली. या प्रकरणी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा दंड ठोठावण्यात आला नाही.

बातम्या आणखी आहेत...