आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद तालुक्यातील सावरगाव बंगला येथे दि. ५ एप्रिलला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. शेंबाळपिंपरी ते सावरगाव बंगला रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान कारवाई केली. या प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खंडाळा पोलिस ठाण्यातील कर्मचारी भीमराव आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथे राहणाऱ्या शामराव धुळे, पुसद तालुक्यातील देवगाव येथील संतोष काळे, शेंबाळपिंपरी येथील संजय कडेल व देवगाव येथील मंगेश चंदेल या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शामराव व संतोष हे दोघे सावरगाव बंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ट्रॅक्टर ( एमएच-२९-ब व्ही-६१५४) ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू ट्रॉलीमध्ये घेऊन जाताना पेट्रोलिंग दरम्यान अडवले होते. तपासात तस्करी करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर त्याच रोडवर ट्रॅक्टरमधून ( एमएच २९-एके-५०९) एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास खंडाळा ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याचे पितळ उघड झाले असून अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे मात्र पोलिसांच्या कारवाईने धाबे दणाणले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.