आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीररित्या जखमी

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेचे काम आटोपून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. ही घटना शहरालगत असलेल्या महामार्गावरील गोदनी चौफुलीवर सोमवार, दि. २० जूनला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गोविंद जागोजी चिकाने वय ५० वर्ष रा. अकोला बाजार असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर राजू तुळशीराम धन कर ३५ वर्ष रा. अकोला बाजार असे जखमीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथील खाजगी वाहन चालक गोविंद चिकाने आणि राजू धन कर दोघेही बँकेच्या कामानिमीत्त सोमवारी दुचाकी क्रमांक एमएच-२९-बीटी-९९६० ने यवतमाळात आले होते.

बातम्या आणखी आहेत...