आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली घटना

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला. ही घटना कळंब ते राळेगाव मार्गावर असलेल्या एका जिनींगजवळ मंगळवार, दि. १२ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. सम्राट गेडाम वय १८ वर्ष रा. पाथ्रड असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून सचिन आत्राम वय २२ वर्ष असे गंभीर जखमी असलेल्या तरूणाचे नाव आहे.

कळंब तालुक्यातील पाथ्रड येथील सम्राट गेडाम आणि सचिन आत्राम हे दोघे मंगळवारी कळंबमध्ये बाजार असल्याने दुचाकीने आले होते. सायंकाळी बाजार करून दोघेही दुचाकीने आपल्या गावी पाथ्रड निघाले होते. अश्यात कळंब ते राळेगाव मार्गावर असलेल्या एका जिनींगजवळ राळेगाकडून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२९-एन-९८२२ ने सम्राट गेडाम याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीने अक्षरशा तुकडे पडले असून सम्राट गेडाम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सचिन आत्राम गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला पुढील उपचारार्थ यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर केले. तर घटना स्थळाचा पंचनामा करून सम्राट गेडाम या तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब ठाणेदार अजीत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.