आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकींची समोरासमोर धडक, एक जागीच ठार

मारेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील करनवाडी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाले ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. सुधाकर तुकाराम अवताळे वय ५५ वर्ष रा. सुसरी, ता. मारेगाव असे मृताचे नाव आहे.

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर करनवाडी बस स्थानकापासून जवळच असलेल्या टायर पंचर दुकानाजवळ हा अपघात घडला. सुसरी येथून सुधाकर अवताळे आपल्या दुचाकीने सुसरी येथून मारेगावकडे येत असताना मारेगावकडुन विरुद्ध दिशेने दुचाकी येत होते.

दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुधाकर अवताळे यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर अवताळे यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...