आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव बोलेरोच्या धडकेत बेंबळा प्रकल्पावरील दोन मजुरांचा मृत्यू; कळंब तालुक्यातील आमला परिसरातील घटना, चालकाविरुद्ध गुन्हा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समोरून भरधाव येणाऱ्या बेलोरो वाहनाने दिलेल्या धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील आमलाजवळ १९ मार्चला रात्री ९ वाजता घडली. गणेश गायकवाड वय २१ रा. इसोली ता. चिखली, जि. बुलडाणा आणि अनिल अंधारे २५ रा. वरूड जि. जालना अशी मृत मजुरांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील इसोली येथील गणेश गायकवाड आणि अनिल अंधारे दोघेही बेंबळा प्रकल्प कॅनलवर मजुरीचे काम करत होते. होळीनिमित्त गणेश गायकवाड हा गावी इसोली येथे गेला होता. दरम्यान शनिवारी तो गावावरून परत कामावर येण्यासाठी निघाला होता. गणेश कळंबपर्यंत आला होता. मात्र तेथून त्याला जाण्याकरिता वाहन मिळत नव्हते. त्यामुळे त्याने मित्र अनिल अंधारे याला दुचाकी घेऊन बोलावले. त्यानंतर दोघेही दुचाकीने जात असताना कळंब तालुक्यातील आमला परिसरात समोरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक एमएच २९ एटी ०३६१ ने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघाही मजुराचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळंबचे सहायक पोलिस निरीक्षक अभय चौथनकर, कर्मचारी झोटिंग यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी त्या बोलेरो वाहन चालकाविरोधात कळंब पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...