आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची चौकशी:वनवारला येथील प्रकार; मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

पुसद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या निधी मार्फत वनवारला ग्रामपंचायतमध्ये भूमिगत नाल्या बनवण्यात आल्या आहेत. काही महिन्यातच नालीवरच्या स्लॅबवर छिद्रे पडली आहे. नालीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी, गुरूवार, दि. २१ जुलै रोजी मनसेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. नालीच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

नुकत्याच बनवण्यात आलेल्या नालीच्या छिद्रामुळे लहान मुलांसह जनावरांचा अपघात होण्याची शक्यता आहे. अवघ्या दोनच महिन्यामध्ये नालीचे हाल झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सात दिवसात चौकशी करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनातून करयात आली आहे. अन्यथा सात दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशारा मनसेने निवेदनातून दिला आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संदीप लांडे, आकाश रहाटे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...