आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍याचा दौरा:शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांचा राज्य दौरा सुरू

यवतमाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्याच्या दौऱ्याची सुरुवात २६ नोव्हेंबरपासून होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातून ते आपला दौरा सुरू करतील. या सभेला जिल्ह्यातून चार ते पाच हजार शिवसैनिक जाणार आहेत. सध्या पक्ष संघटनेचे काम सुरु असून आतापर्यंत एक लाख १० हजार सदस्य नोंदणीचे अर्ज पाठवले असल्याची माहिती संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विजेची समस्या, शेतात वाढलेल्या चोरीच्या घटना, सिंचनासाठी नसलेले पाणी आदी समस्या दोन दिवसात निकाली न निघाल्यास शिवसैनिक शिवसेना स्टाइल आंदोलन करतील, अशा इशारा दिला. पालकमंत्री राठोड शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्यासोबत कुणीही नवीन पदाधिकारी गेलेले नाही. पाटील म्हणाले की, जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा करत मुख्यमंत्री बोम्मई यांनी या गावावर आपला हक्क सांगितला आहे. परंतु बेळगाव महापालिकेसह त्या भागातील शेकडो गावांनी केलेल्या ठरावाची त्यांनी दखल घ्यावी व हा परिसर महाराष्ट्रात समाविष्ट करावा, म्हणजे आपोआप सीमा प्रश्न निकाली निघेल.

बातम्या आणखी आहेत...