आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:उकंडा पोड ग्रा.पं. परिसरातील विहिरीत उडी घेत 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या; शहर ठाण्यात मृत्यूची नोंद, 15 दिवसांपासून एकटीच बडबड करायची

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका २० वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील उकंडा पोड ग्रामपंचायत परिसरात बुधवार, दि. ४ एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सुमित्रा गोविंद देवकर वय २० वर्ष रा. उकंडा पोड मोहा फाटा, यवतमाळ असे मृत मुलीचे नाव आहे.

यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या मोहा फाट्यावरील उकंडा पोड येथे गोविंदा देवकर आपल्या कुटुंबीयांसह राहत असून शेत मजुरीचे काम करीत होते. त्यांची २० वर्षीय मुलगी सुमित्रा ही देखील कुटुंबीयांसह सोबत शेतमजुरीचे काम करीत होती. मात्र गेल्या १५ ते २० दिवसापासून सुमित्रा एकटीच स्वत:सोबत बोलून दिवसभर वेडसरपणासारखे बडबड करीत राहायची. त्यामूळे कुटुंबीयांनी तिला यवतमाळातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते.

अशात बुधवारी सकाळी सुमित्रा हिने उकंडा पोड ग्रामपंचायत परिसरातील वसंता मानकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही बाब परिसरातील महिलांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. दरम्यान कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...