आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेगाव:उमेदच्या संतप्त महिलांनी दिली तहसीलवर धडक; रखडलेले मानधन त्वरित अदा करा, उमेद - महिला कल्याणकारी मंडळाची मागणी

मारेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेद-महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या समूह संसाधन व्यक्तींचे मानधन थकीत आहे. गेल्या १२ महिन्यांपासून रखडलेले मानधन त्वरित अदा करा, या प्रमुख मागणीसाठी उमेदच्या महिलांनी तहसील कार्यालयावर धडक देवून उमेद- कल्याणकारी मंडळ तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सर्व समूह संसाधन व्यक्ती कोविड - १९ च्या परिस्थितीपासून अभियानाचे काम सातत्याने करीत आहे. कोविड -१९ चा सर्वत्र प्रादुर्भाव असतांना देखील अभियानाच्या सर्व समूह संसाधन व्यक्तींनी ग्रामीण भागात केलेल्या मास निर्मिती कार्याची अवघ्या महाराष्ट्रात दखल घेण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील कोविड लसीकरण मोहिमेत उमेद महिला समूह संसाधन व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात सहभाग देवून शासनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. गेल्या १२ महिन्या पासून मानधन रखडले असता तरी पण उमेदच्या कामात खंड पडू दिला नाही. याकरिता विविध मागण्यांसाठी उमेदच्या महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उमेद- महिला कल्याणकारी मंडळ तालुका शाखा मारेगावच्या अध्यक्षा उज्वला चंदनखेडे, सचिव मंजूषा कोसरे, कोषाध्यक्ष कल्पना मनें, वर्षा खिरटकर, प्रियंका सिडाम, पंचफुला टेकाम, रेखा जीवने, भारती सातपुते, संगीता डाखरे, पुष्पा भुसारी, प्रभाग कृषी व्यवस्थापक महेश पाचपोहर, प्रभाग पशू व्यवस्थापक प्रफुल्ल शंभरकर आदींसह महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...