आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट ३०३ च्या माध्यमातून इनरव्हील क्लबचा लोगो थीम पिंक फर्स्ट, गरजू महिलांना मजबूत व सशक्त बनविणे या उपक्रमाअंतर्गत रस्त्याच्या कडेला फुटपाथवर आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करणाऱ्या होतकरू कुटुंबाला तीनही ऋतूमध्ये संरक्षक छत्री देण्यात आली.
इनरव्हील क्लबच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम नेहमी राबवले जातात. अशातच क्लबच्या अध्यक्षा आरती तायडे यांनी पुष्पा सोळुंके, मनकर्णा तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरीब, गरजवंत फुटपाथवर शेंगदाणे, फुटाणे विकून घराचा गाडा चालविणारे प्रमोद ढाले व त्यांची पत्नी विजयाताई ढाले यांना छत्री देऊन उन्हासह पावसाळ्यात संरक्षण व्हावे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आरती तायडे यांनी आपल्या आई व सासूच्या स्मृतिप्रीत्यर्थ छत्रीचा आधार दिला.
या अभिनव सामाजिक उपक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आरती तायडे, डॉ. परिणीता आसेगावकर, हेमा, अग्रवाल, डॉ. शोभा भोंगाडे, अर्चना फाळके, नीता कांबळे, मालती चामलवार, शीतल निमोदिया, जयश्री सप्रे, माधुरी गंगथळे, आम्रपाली जाधव, छाया आडे, नीलिमा भुजाडे, गौरी बनगिनवार, वर्षा बेलगमवार, डॉ. आश्विनी नालमवारसह क्लबच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.