आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेड:वाळू तस्कराचा नायब तहसीलदारावर हल्ला; तलाठी गंभीर जखमी, रेती तस्कर फरार

उमरखेड (जि.यवतमाळ)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेले नायब तहसीलदार वैभव विठ्ठल पवार व तलाठी गजानन विठ्ठल सुरोशे यांच्यावर वाळू तस्कराने हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. तालुक्यातील विडूळ खंडातील नाल्यावरून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर महसूल विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री गो. सी. गावंडे महाविद्यालयाजवळ सापळा रचून टिप्पर अडवला. यात २ ब्रास वाळू होती टिप्परमध्ये चौघे होते. या सर्वांना थांबवून भरारी पथकाने चौकशी सुरू केली. दरम्यान, चौघांपैकी एकाने त्याच्या मोबाइलवरून फोन लावला.

थोड्या वेळातच एका कारमधून चौघे आले. त्यापैकी अविनाश चव्हाण या युवकाने तलाठी गजानन सुरोशे यांच्या गळ्याला चाकू लावला. यावर नायब तहसीलदार पवार यांनी टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यास सांगताच चव्हाण याने पवार यांच्या पोटात चाकू खुपसला आणि सर्व जण फरार झाले. पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...