आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत‎ तालुका समाधान शिबिर 22 जानेवारीला‎

वाशीम‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध‎ प्रश्नांची, त्यांच्या तक्रार अर्जाची‎ सोडवणूक करण्यासाठी त्यांचे अर्ज‎ तालुका पातळीवर निकाली काढून‎ त्यांचे समाधान करण्यासह त्यांना‎ योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी‎ सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत‎ तालुका समाधान शिबिराचे आयोजन‎ २२ जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला‎ करण्यात आले.‎ समाधान शिबिराच्या‎ आयोजनाबाबतची गावपातळीवर‎ व्यापक प्रसिद्धी तलाठी आणि‎ ग्रामसेवकांच्या माध्यमातून करण्यात‎ येणार आहे. ७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान‎ समाधान शिबिराकरिता तहसील‎ कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण‎ करून नागरिकांच्या तक्रारी व निवेदन‎ स्वीकारून अर्जदाराला टोकन क्रमांक‎ देण्यात येईल.

प्राप्त झालेले निवेदन व‎ अर्ज संबंधित कार्यालयात देण्यात‎ येतील. ९ डिसेंबरपर्यंत संबंधित‎ विभागास तक्रार/निवेदन प्राप्त‎ झाल्यानंतर विभाग प्रमुख यावर‎ कार्यवाही करतील. १६ डिसेंबरला‎ संबंधित विभागाकडे निवेदने व तक्रारी‎ प्राप्त झाल्यानंतर विभाग प्रमुख‎ आढावा घेऊन कार्यवाही करून‎ तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना‎ सादर करतील.‎ २२ डिसेंबरपर्यंत तहसीलदारांकडे‎ प्राप्त झालेली टिपणी‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल .

३०‎ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त‎ झालेल्या टिप्पणीवर संबंधित‎ विभागाची बैठक घेऊन अभिप्रायासह‎ विषयाच्या अनुषंगाने अंतिम शेरा‎ लिहून अंतिम टिपणी तयार करण्यात‎ येईल. २२ जानेवारीला वाशीम,‎ मालेगाव व रिसोड तालुक्याशी‎ संबंधित आणि ५ फेब्रुवारी रोजी‎ मंगरुळपीर, कारंजा व मानोरा‎ तालुक्याशी संबंधित समाधान‎ शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी‎ कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन‎ येथे करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...