आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:हर घर तिरंगा अभियानांतर्गत 23 रुपयांत सहज मिळणार राष्ट्रध्वज

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर झेंडा फडकवण्यासाठी नागरिकांना सहज राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व ठिकाणी नागरिकांना केवळ २३ रुपयात राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वज विक्रीचा शुभारंभ ही करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सविता चौधरी, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी मुरली नाथ वाडेकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, तहसिलदार कुणाल झाल्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, प्राचार्य प्रशांत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.

यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सध्या एकूण ४ लाख झेंडे उपलब्ध केले असून ते विक्रीसाठी सर्व पंचायत समिती व सर्व नगरपालिका यांचेकडे वितरीत करण्यात येत आहेत. नागरिकांना वरील विक्री केंद्रावर २३ रुपयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येत असून सर्वांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...