आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:वर्धा जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा विक्रीचा शुभारंभ

वर्धा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना सुलभतेने झेंडे उपलब्ध होण्याकरिता ठिकठिकाणी विक्री केंद्र सुरू केले जात आहेत. त्याअंतर्गत वर्ध्यात जिल्हास्तरीय झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा माहिती अधिकार मंगेश वरकड उमेदचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हर घर तिरंगा हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ५० हजारावर झेंडे लावण्याचे नियोजन आहे. यात शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट, शाळा, महाविद्यालये आदी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. त्या अंतर्गतच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वर्धिनी विक्री केंद्र वर्धा येथे झेंडा विक्रीचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनुश्री वानखडे, विलास झोटींग, हेमंत काकडे, गोपाल साबळे, संदीप कांबळे, उज्ज्वल गुजर उपस्थित होते.