आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ शहरातील श्रीकृष्ण नगरातील नागरिकांनी मात्र प्रशासनावर अवलंबून न राहता स्वखर्चाने तसेच मेहनतीने बगिचा फुलवला असून शिवसेना नेते माजी मंत्री अरविंद सावंत यांनी सुध्दा भेट देऊन नागरिकांचे कौतुक केले आहे.
श्रीकृष्ण नगरात अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. अनेक कामाच्या बाबतीत प्रशासनाकडून सतत विलंब होतो अथवा कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा नागरिकांना अनुभव आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण नगरातील नागरिकांनी मात्र प्रशासनाकडून कुठल्याच निधीची अपेक्षा न ठेवता स्वताच श्रीकृष्ण नगरातील बगिचा फुलवण्याचा निर्धार केला. गेल्या दोन वर्षापासून हा बगिचा फुलवण्यासाठी निरव गढीया यांचा परिवार तसेच परिसरातील नागरिकांनी परिश्रम सुरु केले. या बगिच्यात त्यांनी रॉयल पाम, मेहंदी, जांभूळ, बादाम, बांबू, मोगरा, तुलसी यासह अनेक झाडे लावली आहे. झाडे जगविण्यासाठी ड्रीप इरिगेशन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुध्दा करण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी बगिच्यात वॉकिंग ट्रॅक सुध्दा तयार करण्यात आला आहे. वृक्षाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने श्रीकृष्ण नगरातील नागरिक रोज सकाळी तसेच सायंकाळी येथे वॉकिंग करण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे ही झाडे जगविण्यासाठी नागरिकांनी रोज परिश्रम केले.
झाडे जगावी यासाठी रोज पाणी दिल्या जाते. स्वखर्चाने बगिचा तयार करुन तसेच सर्वच झाडे जीवंत ठेवल्याने हा बगिचा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. विशेष म्हणजे नुकतेच शिवसेनेचे नेते माजी केन्द्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी श्रीकृष्ण नगरातील या बगिच्याला भेट दिली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, युवा सेना जिल्हा प्रमुख विशाल गणात्रा, विनीत हातगावकर, शुभांकर भट, अक्षय गढीया, लकी गढीया, हितेश खलपाडा उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.