आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रस:सोसायटीच्या निवडणुकीत एकतर्फी विजय; गुलाल उधळत जल्लोष साजरा

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्रस तालुक्यातील डोळंबवाडी, वाईमेंढीत फडकला ‘परिवर्तन’चा झेंडा

दिग्रस तालुक्यातील डोळंबवाडी व वाईमेंढी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवडणूक मोठ्या चुराशीत संपन्न झाली. या निवडणूकीत परिवर्तन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत सत्ताधारी गटाला धूळ चारत परिवर्तन पॅनलचे डोळंबवाडीचे १३ व वाईमेंढीचे १३ अशा सर्व संचालकांनी विजय मिळवला. निवडणूकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत विजयी जल्लोष साजरा केला.

दिग्रस तालुक्यातील अनेक गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संचालकांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका लागू झाल्या. नुकत्याच डोळंबवाडी व वाईमेंढी येथे या निवडणुका पार पडल्या. डोळंबवाडी येथे पंचायत समितीत शिवसेनेचा प्रतिनिधी आहे आणि याच जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुद्धा शिवसेनेचा प्रतिनिधी आहे. सत्ताधारी गट असतांना देखील सोसायटीच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाला विजय मिळविता आला नाही. डोळंबवाडी येथील सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत परिवर्तन विकास आघाडीचे संजय सुभाष राऊत, दिलीप आलासिंग राठोड, पुष्पाबाई अमृत भवरे, लिलाबाई नरसिंग राठोड, भिमराव आनंदराव खारोडे, डोमा रामजी अंबोरे, ज्ञानेश्वर किसन गव्हाणे, विजय नामदेव खटारे, अमृत नारायण कुंचटवार, बाळकृष्ण परशराम मानतुटे, गणेश बळीराम पवार, माणिक भिका राठोड, श्रावण शिवराम उकंडे अशा १३ उमेदवारांनी मतांच्या मोठ्या अंतराने विजय मिळविला. तसेच वाईमेंढी येथील विष्णू विठ्ठलराव भनक, किशोर भगवानजी मेहेत्रे, बळीराम नारायण काळे, शिवाजी रामकृष्ण आंबेकर, शरद श्रीराम परंडे, अरविंद हरिभाऊ काळे, विनोद मधुकर हरकर, विनोद सुखदेव जागृत, सुरेखा पांडुरंग जाधव, जयाबाई सुभाष इंगोले, शामराव काशीराम होलगरे, दिनेश तुकाराम सोळंके, गजानन गोविंदा गावंडे अशा १३ उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत सत्ताधारी गटाला धूळ चारली.

निवडणूकीचा निकाल जाहीर होताच गावामध्ये विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. त्यानंतर परिवर्तन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन विजयी उमेदवारांनी परिवर्तन पॅनलच्या विजयाची खुशखबर दिली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत विरोधी गटावर निशाण साधला. सोसायटीची अगदी छोटीशी निवडणूक असते. यात गावातील नागरिक उमेदवार ठरवतात आणि निवडून देतात. मात्र दिग्रस विधानसभेचे आमदार माजी मंत्री संजय राठोड यांनी भूमिपूजनाच्या माध्यमातून प्रचाराचं काम केलं. सोबतच गावकऱ्यांना खोटी आश्वासने दिली आणि दिलेली आश्वासने ही खोटी असल्याचा विश्वास गावकऱ्यांना होता त्यामुळेच डोळंबवाडी व वाईमेंढीतील सोसायटीच्या या निवडणुकीत त्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...