आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:नोकरीचे आमिष दाखवून तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीचे आमिष दाखवून एका ३३ वर्षीय तरुणावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. ही धक्कादायक घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या नवीन एमआयडीजवळ शनिवार, दि. ५ नोव्हेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी हिंमत बोबडे वय ३६ वर्ष रा. राणी सती ले-आऊट, यवतमाळ याला ताब्यात घेतले आहे.

नांदेड जिल्ह्यातील पिडीत तरूण त्याच्या भावासह यवतमाळात नोकरीसाठी आले होते. अश्यात घरा शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्या दोघांना लोहारा एमआयडीसी काम आहे, त्या ठिकाणी लावून देतो, असे म्हणत आर्णी मार्गावरील एका बारमध्ये शनिवारी बोलावले. दरम्यान दोघेही भाऊ त्या ठिकाणी पोहचले, यावेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्या दोघांची ओळख हिंमत बोबडे याच्यासोबत करून दिली. यावेळी चौघांनीही त्या ठिकाणी मद्यप्राशनही केले. अश्यात हिंमत याने नोकरी लावून देण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिली. दरम्यान चौघेही त्या ठिकाणाहून आपापल्या घरी निघून गेले. काही वेळानंतर पिडीत तरुणाच्या भावाला हिंमत याने फोन करून पिडीत तरुणासोबत काम आहे म्हणून त्याला पाठवण्यास सांगितले.

यावेळी पिडीत पुन्हा हिंमत याला भेटण्यासाठी त्या बारवर पोहचला. दरम्यान हिंमत याने त्याला दुचाकीवर बसवून लोहारा एमआयडीसीमधील मालकाला भेटून तुझ्या नोकरीबाबत बोलू असे सांगितले. त्यानंतर लोहारा परिसरात असलेल्या नवीन एमआयडीजवळ पिडीत तरुणासोबत हिंमत याने अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार पिडीत तरुणाने आपल्या भावाला सांगत अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंमत बोबडे याच्याविरोधात विविध गुन्हे नोंदवून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...