आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कामगार नोंदणी कार्यालयाकडून कामगारांचा होतोय नाहक छळ; कामगार संघटनेचे मंत्र्यांना निवेदन

बाभुळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्हास्तरावर असलेल्या कामगार नोंदणी कार्यालयाकडून ग्रामीण भागातील मजदूर, कामगारांचा अक्षरश: छळ केल्या जात आहे. कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनाही कार्यालयाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. या व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जन वादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेने महाराष्ट्राचे कामगार तथा ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शुक्रवारी निवेदन दिले.

कामगार नोंदणी करते वेळी कामगार, मजूर यांचेकडून सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाते. परंतु असे असतानाही जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेकडून संबंधीत कामगाराला ज्या शासकीय कंत्राटदाराकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र आणले आहे, त्या कंत्राटदाराचे मुळ अनुज्ञप्ती (लायसेंस) प्रमाणपत्राची प्रत मागण्यात येत आहे. कोणताही कंत्राटदार त्याच्या अनुज्ञप्तीची मुळप्रत देणार नाही हे सत्य आहे. तो स्वतः सही शिक्क्यानिशी सदरचा कामगार हा काम करीत असल्याबाबत ९० दिवसांचे प्रमाणपत्र देत असताना कामगार कार्यालयाकडून अश्याप्रकारे अनुज्ञप्तीची मागणी करत नाही. व तसा कुठलाही शासकीय जी.आर., परिपत्रक नाही.

असे असताना फक्त मनमानी कारभार करण्याचे उद्देशाने गरीब, गरजू कामगारांना नाहक त्रास देण्यासाठी कामगार कार्यालय असा प्रकार करीत आहे. तसेच मजदूर संघटनेच्या माध्यमातून कामगार नोंदणीचे काम करीत असताना जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडून संघटनेला कामगार नोंदणी करण्यासाठी मनाई करण्यात येत आहे. या प्रकरणी स्वतः मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी जन वादी बांधकाम कामगार मजदूर संघटना अध्यक्ष रत्न पाल डोफे, कोषाध्यक्षा सुजाता डोफे, चंदन भोंगाडे, राहुल मोडक, सम्यक म्हैसकर, सयम शेळके, विष्णु राऊत, बाळु मसराम, हरिदास निमसडे, दिलीप गाडगे, अमोल नाईक, चेतन खोडे आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...