आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक न्यायविभागाने मागील १०वर्षात अनुसूचित जातीआणि अनुसूचित जमातीघटक योजनेतील ३०हजार कोटी निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे या समाजाच्या विकासाला खीळ बसली असून तेलंगणा कर्नाटक व राजस्थानमध्ये अनुसूचित जाती जमाती विकास निधीकरीता वेगळा कायदा आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करावा ज्यामुळे प्रत्येक वर्षातील अखर्चित निधी पुढील वर्षी वापरता येईल व अनू जाती जमातींच्या लोकांना न्याय देता येईल व या घटकांचा निधी खर्च करणे कायद्यामुळे अनिवार्य राहील अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या संदेश रणवीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे सन २०२२-२३ या वर्षामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत क्षेत्रनिहाय प्रस्तावित निधी होता १२ हजार २३० कोटी निधीपैकी केवळ ४ हजार ५८१.१ कोटी खर्च झाले.
तसेच अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमाअंतर्गत १२ हजार ५६२.८९ कोटी पैकी ५ हजार ८२८.१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. म्हणजेच २०२२-२३ मध्ये दोन्ही घटक योजनेतील अखर्चित १४३८३.६ रुपये कोटी निधी असल्याचे निदर्शनास येते.तसेच मागील १० वर्षात एकूण ३० हजार कोटी निधी अनुसूचित जाती जमाती घटक योजनेतील निधी अखर्चित आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच निराशादायक असून अनुसूचित जाती, जमातींमध्ये असंतोष व निराशा निर्माण करणारी आहे. तेलंगणा, कर्नाटक व राजस्थानमध्ये अनुसूचित जाती- जमाती विकास निधीकरिता वेगळा कायदा आहे.
महाराष्ट्रात देखील असा कायदा व्हायला हवा. त्यामुळे प्रत्येक वर्षातील अखर्चित निधी पुढील वर्षी वापरता येईल आणि अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना न्याय देता येईल, वेगळा कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा विकास निधीकरिता वेगळा कायदा करावा. ज्यामुळे अनू जाती - जमातीचे उत्थान होईल असेही पत्रात संध्या रणवीर यांनी निवेदीत केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.