आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे अनावरण:थाळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रतिमेचे अनावरण

कळंब12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या थाळेगांव ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

आदिवासी समाजातील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्म यांची वर्णी लागल्याने थाळेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनेश वानखडे यांचे नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढून थाळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप युमोचे तालुकाध्यक्ष दिनेश वानखडे, कळंब पंचायत समितीचे सचिव महेश इंगोले, स्वप्नील धनरे, प्रेम शेंडे, वैभव लाडेकर, अजय कावरे, अनिकेत गायकवाड, प्रज्वल कराळे, मनीष येलेकार, शुभम लाडेकर, नवनीत किटके, सुधाकर चौधरी, साहिल झाडे, कुशल पडोळे आदी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...