आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील प्रशासनाचे निर्देश:आधार अपडेट करा अन्यथा अनुदान होणार बंद

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृद्ध, अपंग, विधवा आणि परित्यक्ता महिलांना हयातीचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले असले तरी आता आधार कार्ड अपडेट करावे लागणार असल्याची सक्ती तहसील प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. परिणामी शेकडो वृद्ध निराधारांना तहसील कार्यलयात पायपीट करावी लागत आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागांतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी योजनांच्या अंतर्गत राज्यातील निराधारांना प्रती महिना एक हजार रुपये असे एकत्रित मानधन राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून दिले जाते. मात्र काही कालावधीनंतर वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्यास यांची माहिती प्रशासनाला कळत नाही.

तसेच काही लाभार्थ्यांचे मुल प्रशासकीय सेवेत असतांना देखील निराधार योजनांचा लाभ घेताना प्रशासनाच्या निदर्शनास आले. याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र व आधार अपडेट तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जमा करावे. अन्यथा अनुदान बंद करण्यात येणार आहे. याकरीता योजनांच्या लाभार्थ्यांची तहसिल कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.

जिल्ह्यातील निराधारांसाठीच्या योजना व लाभार्थी
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना - ३१९, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना - ३९१२६, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन - १८२१, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन - ३२२, श्रावणबाळ सेवा राज्य नि.वेतन अनुसूचित जमाती - १११७८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अ.जाती - ११२९१, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सर्वसाधारण - ६७१९६, संजय गांधी निराधार योजना अ. जमाती - ७१६०, संजय गांधी निराधार योजना अ. जाती - ७३०३, संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण – ३५७९४, एकूण - १८१५१०.

बातम्या आणखी आहेत...