आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासवर्ग:ग्राहक कायद्याचा प्रभावीपणे उपयोग करा : अॅड. भोसरेकर‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीत‎ अ. भा. ग्राहक पंचायतचे मोलाचे‎ योगदान असून सर्वसामान्य‎ ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी‎ ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी या‎ कायद्याचा प्रभावीपणे उपयोग‎ करावा, असे आवाहन ग्राहक‎ पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुणे‎ विद्युत ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष‎ अॅड. अजय भोसरेकर यांनी केले.‎ येथील दीनदयाल प्रबोधिनीत‎ आयोजित ग्राहक पंचायत विदर्भ‎ प्रांतच्या अभ्यासवर्गात ते बोलत‎ होते.‎ अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांताध्यक्ष‎ डॉ. नारायण मेहरे उपस्थित होते.‎ प्रांत सचिव नितीन काकडे, संगठन‎ मंत्री डॉ. अजय गाडे यावेळी‎ मंचावर उपस्थित होते.

सर्वसामान्य‎ ग्राहकांना संरक्षण कायदा समजावून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांगण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांनी हा‎ कायदा योग्य प्रकारे समजून‎ घेण्याची आवश्यकता असल्याचे‎ सांगून विविध महाविद्यालयीन‎ विद्यार्थी तसेच अन्य समाज‎ घटकांसाठी या कायद्याच्या‎ प्रसाराकरता ग्राहक चळवळीतील‎ कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असेही‎ त्यांनी सांगितले.‎ वीज कायद्यातील तरतुदींचा‎ ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी‎ अभ्यास करण्याची आवश्यकता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असल्याचे सांगूण महावितरणाच्या‎ प्रचलित कार्यप्रणालीत अनेक त्रुटी‎ असून, त्या दूर करण्यासाठी‎ ग्राहकांनीच पुढाकार घ्यावा त्यासाठी‎ कार्यकर्त्यांनी प्रभावी ग्राहक जागरण‎ करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.

ग्राहकांना या संदर्भात‎ जागृत करण्याची विशेष जबाबदारी‎ ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांची‎ असल्याचे अॅड. भोसरकरांनी‎ सांगितले. वीज समस्येत अंतिम जो‎ ग्राहक असतो त्यावर साधक बाधक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चर्चा आणि विचार होणे गरजेचे‎ आहे. वीज ग्राहकांनी आपले‎ हक्क समजून घेण्यासाठी वीज‎ कायद्याचे अध्ययन करणे गरजेचे‎ असून त्यासाठी महावितरणाच्या‎ सहकार्याने वीज ग्राहक मेळावे‎ आयोजित करण्याचे आवाहन‎ विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे‎ यांनी केले. प्रा. मतीन खान यांनी‎ पाहुण्यांचे स्वागत केले. प्रांत सचिव‎ नितीन काकडे यांनी कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...