आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:मोबाइलमधील इंटरनेटचा वापर आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी करा

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या. मोबाईल मधील इंटरनेटचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करा व स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून मोठे व्हा असे प्रतिपादन महेंद्र मानकर यांनी केले.

उमरखेड येथील सुमेध बोधी विहार येथे इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेंद्र मानकर मार्गदर्शन करतांना म्हणाले, निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसून ते एक नवीन आयुष्य आहे. त्यामुळे ते निवृत्त व्यक्ती नसून यंग सिनियर्स आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे, प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा खडसे, डॉ. अविनाश खडसे, पुसद अर्बन बँकेचे व्यवस्थापक वाडेकर, प्रा. डॉ. धनराज तायडे, बाळासाहेब डाखोरे, सुमेध बोधी विहाराचे अध्यक्ष प्रो. डॉ. अनिल काळबांडे उपस्थित होते.

यावेळी दीपक कांबळे (पोलीस प्रशासन) सुभाष वाठोरे (विस्तार अधिकारी) माधव पडघणे (विस्तार अधिकारी) माधव मोरे (शिक्षक) प्रा. नंदकिशोर भगत, गौतम मुनेश्वर (कृषी विभाग) संभाजी पाईकराव (सेवानिवृत्त मेजर) भीमराव आठवले (नगरपालिका उमरखेड) बेबीताई गायकवाड (शिक्षिका) पुण्यरथा नगारे (उपक्रमशील शिक्षिका) यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्ष स्थानावरून खडसे यांनी सुमेध बोधी बुद्ध विहार विकास कसा झाला, समाजाने कसे सहकार्य केले आणि समाज यांनी एकत्र राहिल्यास कशी प्रगती होती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहार समितीचे अध्यक्ष प्रो. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजा धांडे यांनी केले. आभार प्रा. गजानन दामोदर यांनी मानले.कार्यक्रमाच्यासाठी सचिव भीमराव सोनुले, उत्तम शिंगणकर, संतोष निथळे, राहुल काळबांडे, सुदाम कांबळे, विश्वभर भुकतारे, यासह सुमेध बोधी बुद्ध विहार समिती व सावित्रीबाई फुले महिला मंडळांनी खूप खूप सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...