आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती यंत्र:बियाणे लागवडसाठी आता आधुनिक यंत्राचा वापर; यंत्राद्वारे वेळेची बचत आणि खर्चही कमी

मारेगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस शेती करणं फार अवघड होत आहे. कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी माणूस, बियाणे खते वेळेवर भेटत नाही. त्यामुळे शेतीची मशागत वेळेवर होत नाही परिणामतः उत्पादनात घट होते. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीत नवीन नवीन यंत्राचा वापर करून वेळेसह पैशाचा बचत करीत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत शेतात सरकी, तूर, चना आदी बियाणे परंपरागत पद्धतीने लावायचे आणि उत्पादन ही मोठ्या प्रमाणात व्हायचे. परंतू या काही वर्षात शेती करणे साधे काम राहीले नाही. बियाणे, खते, मजुरी आदी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन कमी झाले आहे. त्यात भाव ही उत्पादनाच्या आधारावर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे म्हणजे जुगारासारखे झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात अनेक प्रयोग करताना दिसून येत आहे. बाजारात नुकतेच एक बीज पेरणी यंत्र उपलब्ध झाले आहे ते तालुक्यातील विजय घोटेकर यांनी बीज पेरण्याचे यंत्र आणले आहे.

यामधून सरकी, तुर, चना, बरबटी, मूग आदी पेरणी करू शकता. या यंत्रामुळे वेळ पैसा वाचते, ज्या अंतरावर आपल्याला टोबणी करायची आहे, त्यानुसारच टोबणी होते. त्यामुळे बियाणे वाया जात नाही तर अनेक फायदे होते. असे शेतकरी विजय घोटेकर यांनी सांगितले. ऐका दिवशी साधारणत एका मशीनद्वारे जवळपास चार एकर येवढे जमिनीवर बियाणे पेरणी टोबणी करत येते. बियाणे अतिरिक्त वाया जात नाही, यात तुम्हाला जेवढ्या अंतरावर बियाणे लावायचे आहे. तेवढे अंतरही ठेवता येते. यासाठी पेट्रोल डिझेल लागत नाही. केवळ एक व्यक्ती या यंत्राला सांभाळू शकतात.

बातम्या आणखी आहेत...