आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदान:मार्डी येथे श्रमदानातून‎ बांधला वनराई बंधारा‎

मारेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जगन राठोड उपविभागीय कृषी‎ अधिकारी पांढरकवडा यांच्या‎ मार्गदर्शनाखाली तालुका कृषी‎ अधिकारी कार्यालय मारेगाव यांचे‎ मार्फत मार्डी येथे श्रमदानातून बंधारा‎ बांधण्यात आला. तसेच‎ तालुक्यातील गावोगावी वनराई‎ बंधारे बांधण्यात आले.‎ तालुक्यात ३० ते ४० बंधारे‎ आतापर्यंत श्रमदानातून टाकण्यात‎ आले आहे. अजूनही छोट्या‎ नाल्यावर वाहणारे पाणी अडवून‎ बंधाऱ्याचे काम इतर गावात सुरू‎ आहे.

यामुळे उन्हाळ्यात‎ जाणवणारी पाण्याची कमतरता‎ यामुळे काही प्रमाणात कमी होणार‎ असून जमिनीत पाणी मुरण्यास मदत‎ होईल तसेच बंधाऱ्या मुळे लगत च्या‎ परिसरातील विहिरींची पाणी पातळी‎ वाढण्यास मदत होईल व नाल्या‎ लगतच्या शेतकऱ्यांना संरक्षित‎ ओलित करण्यास मदत होईल,‎ वनराई बंधाऱ्याचे महत्व लक्षात घेता‎ छोट्या नाल्या लगतच्या प्रत्येक‎ शेतकरी बंधूनी पाणी अडवून वनराई‎ बंधारा टाकावा असे आव्हान कृषी‎ विभाग मारेगाव यांचे मार्फत‎ करण्यात येत आहे.

यावेळी तालुका‎ कृषी अधिकारी निकाळजे, मंडळ‎ कृषी अधिकारी कनाके, कृषी‎ सहायक डी. ए. गाडगे, पी. ए.‎ कचाटे, एच. बी. पवार, ये. यु.‎ सोनूले, आर. जे. सयाम, कु. एस.‎ मेश्राम इत्यादींनी सहभाग नोंदविला.‎

बातम्या आणखी आहेत...