आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅली काढण्यात आली. स्वच्छ कार्यालय, रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध उपक्रम राबवण्यात आले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सायकल चालवणे आवश्यक असल्याचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला. तहसील कार्यालयातून तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.
या सायकल रॅलीत तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, पाणी पुरवठा अभियंता गौरव मांडळे, पाणी पुरवठा लिपिक राजेश इंगोले, आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोविंदवार, महसूल सहाय्यक स्वाती हिरास, वरिष्ठ सहाय्यक भाग्यश्री थेर, श्रीमती पांडे, अंकुश इंगोले, सहदेव उघडे, चेतन श्रीवास, शाहिद पटेल, इरफान खान, दीपक काळे, गोपाल किसरवार, नासिर, संजय सरबेरे, नितीन डहाके, महादेव मोडले यांच्यासह शाळेचे विद्यार्थी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.