आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:डॉ.नंदुरकर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संपुर्ण भारतभर विविध कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या आदेशान्वये डॉ. नंदुरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय क्रीडा दिवसाची सुरुवात हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

विद्यालयातील श्रीराम गायमुखे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयाच्या मैदानावर विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविण्याची मुलांना संधी मिळाली.त्यात खोखो, व्हॉलीबॉल, संगीत खुर्ची, कबड्डी, धावण्याची स्पर्धा, लंगडी, टेनिक्वाईट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.शारीरीक, मानसिक, बौद्धिक विकास हा खेळातून साधला जातो. त्यामुळे मुलांनी मैदानी खेळाला आपल्या जीवनात महत्त्व दिले पाहिजे असेही सांगितले. विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ज्योती बावीसकर यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापिका बावीसकर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम गायमुखे तथा शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...