आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर आयोजित:फार्मासिस्ट आठवड्यानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ स्थानिक पी. वाधवानी फार्मसी ‎महाविद्यालयात २१ ते २८ सप्टेंबर‎ दरम्यान जागतिक फार्मसी आठवडा उत्साहात साजरा करण्यात आला. या ‎दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात‎ आले.‎ यात २६ सप्टेंबरला महाविद्यालयात ‎रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या ‎शिबिराकरिता एेश्वर्या रक्तपेढी यांचे‎ सहकार्य लाभले. या शिबिरात एकुण २५‎ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.‎ गुरुवारी महाविद्यालयात रोग निदान‎ शिबिर आयोजित केले होते. या‎‎ शिबिराकरिता डॉ. विनोद भोंगाडे यांचे‎ सहकार्य लाभले.

यात‎ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या‎ रक्तातील घटकांचे प्रमाण शोधून रोग‎ निदान केले. महाविद्यालयाच्या‎‎ औषधीय वनस्पतीच्या बगिचामध्ये‎ तुळशी, अश्वगंधा, सर्पगंधा, तेजपान,‎ लवंग, विलायची औषधीय वनस्पती‎ लावल्या. महाविद्यालयात जागतिक‎ फार्मसी आठवड्याचे औचित्य साधून‎ नॅशनल लेवल सायंटिफिक पोस्टर‎ स्पर्धा आयोजित केली होती.

या‎ स्पर्धेकरिता बी फार्म व एम फार्म‎ अभ्याक्रमातील विविध राज्यातील‎ एकूण २३९ स्पर्धकांनी सहभाग‎ नोंदवला. पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये‎ आलेल्या पोस्टरचे परीक्षण डॉ. दीपक‎ मोहाळे, डॉ. माधुरी चन्नावार, डॉ.‎ नितीन कोचर व डॉ. भारती बाकडे यांनी‎ केले. प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार‎ यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम‎ अधिकारी प्रा. वैभव दारव्हेकर, प्रा.‎ ओम बिलोने, डॉ. अभिजित श्रीराव,‎ प्रा. सूरज लांडगे, प्रा. अनिल देवाणी,‎ प्रा. परेश वाधवानी यांनी काम पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...