आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री. गजानन महाराज प्रगट सोहळा निमित्त देउरवाडा (पु.) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दि.७ फेब्रुवारी ते दि. १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत भजन, हरिकीर्तन, काल्याचे कीर्तन, विजय ग्रंथाचे पारायण, काकड आरती असे साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले आहे. हभप नथ्थूजी महाराज चिखलकर, तुळशीदास गुरुजी ढोले, तुळशीराम महाराज बावणे, प्रभाकर गायकवाड महाराज, डांगे महाराज, भानुदास महाराज यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात येत आहे. गजानन महाराज प्रगट सोहळा निमित्त मोफत रोगनिदान शिबिर सोमवार, दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते ४ वाजता घेण्यात येणार आहे.
यासाठी नागपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. एस. पी.विनकर रुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहे. तसेच दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री. गजानन महाराज पालखी सोहळा व भव्य दिव्य मिरवणूक सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख ,पांडुरंग खुरसडे सह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व सर्व भक्त गण हजर राहणार आहे. श्री. गजानन महाराज संस्थान देऊरवाडा येथील प्रगट सोहळा दि.१ जानेवारी १९९० पासून सुरु झाला आहे.
गजानन महाराज संस्थान साठी ह.भ.प.नथ्थूजी महाराज चिखलकर यांनी स्वतः मंदिरासाठी १८०० फुट जागा दान दिली आहे. दि.१ जानेवारी १९९५ रोजी मंदिर उभारणी झाली व दि.१ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००९ पर्यंत मंदिरात गजानन महाराज यांच्या पादुका व त्यांची प्रतिमाचे पूजन केले जात होते. तदनंतर संत गजानन महाराज प्राण प्रतिष्ठा दि. ९ जानेवारी २००९ ला करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी प्रगट सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम राबवून हा उत्सव साजरा केला जातो. कीर्तन,भजन,भागवत यासारखे विविध भक्तिमय कार्यक्रम घेण्यात येतात. सोमवार , दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दुपारी २ ते ५ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भावीकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान सर्व विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी देउरवाडा (पु) यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.