आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासन स्तरावर सहकार मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात २४ मे ला झालेल्या बैठकीत दिले. यावेळी माजी आमदार विजयराव खडसे ‘वसंत’चे माजी अध्यक्ष तातू देशमुख उपस्थितीत होते. वसंत सहकारी साखर कारखाना भाडेपट्टयावर देण्यासंदर्भात करण्यात आलेले प्रयत्न व त्यासाठी येत असलेल्या अडीअडचनीबाबत चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यासाठी कारखान्याचे विद्यमान अवसायक यांनी १७ मे ला सभा आयोजीत केली होती. या सभेसाठी कारखान्याचे आमदार माजी आमदार यांचे सर्व सभासद, सर्व कमागार, सेवा निवृत्त कामगार, वसंत ऊस उत्पादक सभासद संघ, वसंत साखर कारखाना बचाव समिती, कामगार युनियन इत्यादी च्या उपस्थितित कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी एकमुखी निर्णय झाला. वसंत सहकारी साखर कारखाना भाडेपट्टयावर देण्यासंदर्भात करण्यात आलेले प्रयत्न व त्यासाठी येत असलेल्या अडीअडचनीबाबत चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यासाठी कारखान्याच्या साईटवर सभा १७ मेला आयोजीत केली होती. सभेसाठी उमरखेडचे आमदार माजी आमदार कारखान्यांचे माजी अध्यक्ष यांचेसह सर्व सभासद, सर्व कमागार, सेवा निवृत्त कामगार, वसंत ऊस उत्पादक सभासद संघ, वसंत साखर कारखाना बचाव समिती, कामगार युनियन हे उपस्थितीत होते तसेच चार कंपन्या वसंत कारखाना भाडे तत्वावर चालवल्यासाठी तयार आहेत. त्यात नुकतीच एक टीम ने कारखान्याची पाहणी करून गेले. कामगार युनियनने उच्च न्यायालय, नागपूर येथे इंतिवृत्तात मान्य नसल्याचे आक्षेप घेतला होता. घेतलेला आक्षेप दुरुस्तीमुळे संघटनेचे समाधान होवून घेतलेला आक्षेप केस मथुन (मा.न्यायालयाच्या केस मधून) मागे घेत आहोत. यापुढेही वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणे करीता व कारखाना लवकरात लवकर सुरु करणेसाठी संघटनेचे वेळोवेळी सहकार्य राहील असे लेखी कामगार संघटनेचे अध्यक्ष पि. के. मुडे यांनी दिलेले आहे. त्यामुळे आता वसंत भाडेतत्त्वावर देण्यासाठी कोणताही अडथळा राहिलेला नाही. शासन स्तरावर हालचालीना वेग वाढला आहे येत्या काही दिवसांत भाडेतत्त्वावर देण्या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.