आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांचा आरोप‎:अर्थसंकल्पात वसंतराव नाईक‎ विकास महामंडळाला डावलले‎

मानोरा‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ विदर्भच नव्हे, तर संपूर्ण राज्याला‎ सुजलाम सुफलाम करण्यासाठी अहोरात्र‎ धडपडणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी‎ मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने‎ राज्यातील भटक्या विमुक्तांच्या आर्थिक‎ उत्थानासाठी असलेल्या विकास‎ महामंडळाबाबत विद्यमान सरकारला घोर‎ उदासीनता असल्याची प्रतिक्रिया तांडा‎ सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा‎ यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. अर्थमंत्री‎ तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎ शुक्रवारी सादर केलेल्या‎ अर्थसंकल्पावरून हे अधोरेखित होत‎ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.‎

अर्थसंकल्पात एकीकडे धनगर‎ बांधवांसाठी दहा हजार कोटींची‎ बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्यात‎ आली आहे, तर दुसरीकडे वसंतराव‎ नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या‎ माध्यमातून रोजगार करू इच्छिणाऱ्या‎ भटक्या विमुक्त जाती-जमातीतील‎ बेरोजगारांना या अर्थसंकल्पामध्ये‎ कुठलाही वाढीव दिलासा न दिल्याने एक‎ प्रकारे वसंतराव नाईक आणि भटके‎ विमुक्त यांचा तिटकारा शिंदे-फडणवीस‎ सरकारला असल्याचे आरोप तांडा‎ सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा‎ यांनी केले आहे. बंजारा समाज‎ बांधवाची काशी ‘पोहरादेवी’च्या‎ विकासासाठी पाचशे कोटी रुपयाची‎ तरतूद शासनाने मागे केली. परंतु‎ जगण्यासाठी, रोजगारासाठी,‎ अत्यावश्यक असलेल्या तरतूदींपासून‎ भटक्या विमुक्तांना विद्यमान शासन‎ वंचित ठेवत असल्याचा आरोप नामा‎ बंजारा यांनी केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...