आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी डिपार्टमेन्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील सामायिक प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
कृषि श्रेत्रातील सर्वोच्च डिपार्टमेन्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी घेतलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत देशपातळीवर ऋषिकेश फावडे या विद्यार्थ्यांने सामान्य गुणवत्ता यादीत भारतातून नवव्या क्रमांकावर यश प्राप्त केले, तर वैष्णवी जंगले, ईश्वरी व्यवहारे, मृणाली चौधरी, ऋषिकेश महल्ले, प्रदयुम्न राहटे, ऋषिकेश भारसाकडे, अविनाश घुगे, प्राजक्ता सोनवणे, वैष्णवी तायडे, साहील घुटके, अदिती जाधव, मृणाली वंजारी व सोनाली सिरस्कर या विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांचा नामांकीत विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चीत होणार आहे. डिपार्टमेन्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी, जैवतंत्रज्ञान या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयसीएआर, एमसीईएआर व इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवल्यास शिष्यवृत्ती व फेलोशिप पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळते. हीच यशाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन डॉ. पार्लावार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.