आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेड पोलिसांची धडक कारवाई:पाच लाखांच्या सुगंधित गुटख्यासह वाहन जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमायतनगर कडून उमरखेड येथे येत असलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या वाहनावर उमरखेड पोलिसांनी कारवाई केली. यात पाच लाख रुपयांच्या गुटख्यासह दहा लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

उमरखेड शहरासह परिसरातील काही इसम प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल राठोड, पोलिस हवालदार रवी आडे, रुपेश चव्हाण, इनुस भातनासे, सुनील काळसे, रितेश लांडे यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला होता. अशात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथून बुधवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान बोलोरो पिकअप एमएच २६ बीइ ७६५७ वाहन चालक सय्यद अरशद सय्यद अजगर वय २७ वर्ष, रा. हिमायतनगर हे उमरखेड शहराच्या दिशेने येत होते. त्यावेळी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी वाहन पकडून चालकासह प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेतला. यावेळी बोलोरो पिकपमधील ‎तिघांविरुद्ध गुन्हा दाखल‎ ५ लाख २७ हजार रुपयांचा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या‎ कंपनीचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा जप्त केला.

तर गुटखा मालक सय्यद‎ अमीर सय्यद खमर, रा. हिमायतनगर, शेख रिजवान शेख गिलानी, रा.‎ हिमायतनगर यांच्यावर प्रतिबंधित गुटखा विक्री संबंधित कारवाई केली.‎ त्याचप्रमाणे १० लाख रुपयांचे बोलोरो पिकअप वाहनासह मुद्देमाल जप्त‎ करून पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाईने परिसरातील गुटखा विक्री‎ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे बोलल्या जात आहे.‎ ‎

बातम्या आणखी आहेत...