आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:भांबराजा येथील मलकोजी महाराज शेतकरी, शेतमजूर पॅनलचा विजय; कार्यकत्यांत जल्लोष

हिवरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भांबराजा येथील ग्रामविकास विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या निवडणूकीत स्व. सुनील डिवरे यांच्या गटाच्या तेराच्या तेराही उमेदवारांनी बाजी मारली. सुनील यांचे राजकीय उन्छागाचे पाहिलेले स्वप्न अखेर पूर्णत्वाकडे आले असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहे. विजयी उमेदवाराशी संपर्क साधला असता हा विजय आमचा नसून स्व. सुनील डिवरे यांचा असल्याचे सांगण्यात येत होते.

यावेळी विरोधकांना शह देत पूर्णच्या पूर्ण उमेदवार निवडून आले. डिवरे यांचे राजकीय वलय जैसे च्या तैसे असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने प्रकाश बोंद्रे, राजेश डिवरे, अजय गुलालकर, चंद्रकांत चौधरी, वासुदेव गोमासे, चंद्रकांत जगताप, दिलीप तिरमारे, सुधाकर मांडवकर, जयराम देवरे, नारायण खंडरे, गौत्तम सोंडवले, रेखा डिवरे, नानीबाई चौधरी इत्यादीचा विजय झाला.