आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेवक पुरस्कार:ग्रामविकास अधिकारी जयश्री भुजाडे आदर्श पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकास अधिकारी जयश्री भुजाडे यांना सन २०२०- २१ या वर्षामध्ये उत्कृष्ठ काम कामे केल्यामुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नुकत्याच जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अ, कार्यकारी अधिकारी अरविंद गुडघे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्या उपस्थित जयश्री भुजाडे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच जयश्री भुजाडे यांचे विस्तार अधिकारी कृषी पदी पदोन्नती देण्यात आल्याने भुजाडे यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत धनज येथील सरपंच अंजली हुड, उपसरपंच शुध्योधन चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य पंकज गोल्हर, ज्ञानेश्वर वानखेडे, रिजवान शेख, शीतल वानखेडे, खडसे, शेलारे, ढोकने, शेलेंद्र हुड आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले .

बातम्या आणखी आहेत...