आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बत्ती गुल:वीज वितरण कार्यालयावर ग्रामस्थांची धडक; विजेच्या लपंडावामुळे बोटोनीवासी त्रस्त

मारेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्याभरापासून दररोज सुरू असलेल्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. विजेच्या लंपडावामुळे त्रस्त झालेल्या बोटोनी वासियांची येथील महिला सरपंचासह मारेगाव येथील वीज वितरण कार्यालयावर शनिवार, दि. १८ जून रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान धडक दिली. यावेळी येथील वीज वितरण कार्यालयातील कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने बोटोनी वासीयांनी वीज वितरणच्या गलथान कारभारा विरोधात रोष व्यक्त केला.

मारेगाव तालुक्यात दहा किमी अंतरावर असलेल्या बोटोनी येथे गेल्या महिन्याभरापासून विजेच्या रोज होत असलेल्या लपंडावमुळे ग्रामस्थ कमिलीचे वैतागले असून हवा आली तरी हत्ती गुल असल्याने ग्रामस्तमधे रोष दिसून येत आहे. दि. १८ जून रोजी कोणतेही नैसर्गिक वादळ वारा, पाऊस, विजा नसतांना सुद्धा सकाळी चक्क ८ वाजतापासून येथील विधुत पुरवठा बंद होते. अभावी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी सुद्धा भरता आले नाही.तसेच गावातील आटा चक्की बंद होता तसेच मोबाईल सुद्धा चार्ज नसल्याने बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. येथील विधुत पुरवठेच्या रोजच्या लोडशेडिंगमुळे अखेर त्रस्त झालेल्या बोटोनी वासीयांनी येथील महिला सरपंच सुनीता जुमनाके याच्यासह थेट मारेगाव येथील वीज वितरण कार्यालयावर रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान धडक दिली. यावेळी येथील कार्यरत असलेले कोणतेही अभियंता उपस्थित नसल्याने यांच्या गलथान कारभारा विरोधात रोष व्यक्त करत येथील महिला सरपंचा सुनीता जुमनाके यांनी उपस्थित कर्मचाऱ्याला निवेदन देत उपोषणाचा ईशारा दिला.

यावेळी जिजाबाई कोयचाडे, मीनाबाई वरखडे, सुभद्रा नेहारे, विमल पडाल आदी महिलांसह राजेश पांडे, निलेश शेंद्रे, निलेश कडुकर, अतुल तुरणकर, मुरलीधर गोवरदीपें, नानाजी लालसरे, मंगेश झिंगरे, गणेश ताजने, निलेश खंडाळकर, सुनील खंडाळकर ,रितेश हेपट, चंदू कुमरे, संदीप मडावी, गजानन उईके, आशिष दाते, बापू किनाके, विकास मडावी, मनोज मेश्राम, प्रदीप मडावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...