आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिद्धार्थ ढवळेंच्या मारेकऱ्यांना गजाआड करा’‎:कारखेडाच्या ग्रामस्थांची मानाेरा पाेलिस ठाण्यात धाव; कारवाईची मागणी‎

मानाेरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कारखेड येथील‎ सिद्धार्थ बंडूजी ढवळे यांचा दि. १०‎ एप्रिलला रात्री विजेचा धक्का लागून‎ संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने‎ संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण‎ झाली असून, सिद्धार्थ ढवळे यांची‎ हत्या झाल्याचा अाराेप करीत‎ कारखेडा येथील ग्रामस्थांनी मानाेरा‎ पाेलिस ठाणे गाठून सासरच्या‎ मंडळींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल‎ करून त्यांच्या अटकेची मागणी‎ केली.‎ सिद्धार्थ बंडूजी ढवळे हे खासगी‎ कंपनीत नोकरीला होते. त्यांचे‎ गावातीलच युवतीसोबत दहा‎ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक‎ मुलगा असून, मागील काही‎ वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक‎ मतभेद निर्माण झाले होते.

कौटुंबिक‎ कलह तीव्र झाल्याने ते विभक्त‎ राहत होते. दरम्यान, सिद्धार्थ ढवळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांचा मुलगा सार्थक याच्या‎ वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी‎ त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची‎ घटना घडली. सिद्धार्थ ढवळे यांना‎ सासू-सासरे, पत्नी, चुलत सासरा व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मेहुणी यांनी सार्थकच्या‎ वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी घरी‎ येण्याचे आमिष दाखवून बाेलावले,‎ तसेच घरासमोर असलेल्या‎ कुपातील तारांमध्ये विद्युत प्रवाह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोडून सिद्धार्थ ढवळे यांची अमानुष‎ हत्या केल्याचा अाराेप मृताची आई‎ दुर्गाबाई बंडूजी ढवळे यांनी मानाेरा‎ पाेलिस ठाण्यात निवेदनाद्वारे केला‎ अाहे. तसेच सिद्धार्थ ढवळे यांच्या‎ हत्त्येस जबाबदार असलेल्या‎ सासरकडील मंडळींविरुद्ध खुनाचा‎ गुन्हा दाखल करण्याच्या‎ मागणीसाठी कारखेडा येथील‎ ग्रामस्थांनी अाज मानाेरा पाेलिस‎ ठाणे गाठून संबंधितांना तातडीने‎ गजाआड करण्याची मागणी केली.‎