आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित कुटुंबीयांची भेट:ग्रामस्थांनी शांतता, सुव्यवस्था राखावी आणि सलोख्याचे ऋणानुबंध ठेवावे; आमदार नामदेवराव ससाने यांचे आवाहन

महागाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोखरी येथील मातंग समाजाच्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अण्णाभाऊ साठे चौक पोखरी येथे शांतता सुव्यवस्था राहावी या हेतूने आमदार नामदेव ससाने यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन गावात व वस्तीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन केले. सर्व समाज बांधवांनी मैत्रीचे ऋणानुबंध ठेवावे असा आग्रह आ. ससाने यांनी ग्रामस्थांना केला. शासन शासनाचे काम करेल आपण शांतता ठेवा असे आवाहन केले. यावेळी आमदार ससाने यांनी अन्यायग्रस्त वस्तीला भेट देऊन प्रत्येक घरी जाऊन चर्चा केली आणि धीर दिला.

यावेळी ग्रामस्थांनी आमचे गाव शांतच आहे आणि शांतच राहील असा विश्वास बोलून दाखवला. या भेटी दरम्यान महागाव तालुका भाजपा अध्यक्ष दीपक आडे, महागाव नगराचे उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, तालुका सचिव सुरेश पाटील, बहुजन शक्ती सेनेचे सरचिटणीस नरेंद्र खंदारे, तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत दरोडे, तालुका समन्वयक गजानन जाधव, युवा नेते प्रवीण चव्हाण, राजू पाटील, लहुजी सोनटक्के लक्ष्मणराव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप भोपा राठोड, राहुल आठवले, विजय रेघाटे उपस्थित होते. यावेळी समाज वस्तीतील युवकांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे वचन दिले. यावेळी प्रामुख्याने पंकज लोंढे, अमोल लोंढे, रवी बनसोड, शेषराव लोंढे, लक्ष्मण बनसोड, नारायण वैरागडे, प्रकाश कांबळे, किशोर जोगदंड, किसन बनसोड, तानाजी कांबळे, सुदाम लोंढे, रमेश कांबळे, गोपाल बनसोड, देवानंद लोंढे, बाळू लोंढे, गोपाल लोंढे, आकाश बनसोड, शंकर बनसोड, अनिल लोंढे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...