आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विरुने स्वत:ला घेतले ग्रा.पं. कार्यालयात कोंडून;  ग्रामसेवकाने कोंडल्याचा आरोप

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीरू फेम नावाने सर्वत्र चर्चेत असलेला श्याम गायकवाड यानी आतापर्यंत शासकीय कार्यालयात आंदोलने केली. आता श्यामने चक्क इसापूर ग्रामपंचायतमध्ये स्वत:ला कोंडून घेतल्याने एकाच खळबळ उडाली होती. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ग्रामसभा झाल्यावर घडली. दिग्रस तालुक्यातील इसापूर व वसंतपूर खर्डा येथे ५ एप्रिलला ग्राम सभा आयोजित केली होती. ग्रामसभा ही सकाळी १०.३० वाजता समाप्त झाल्याची घोषणा झाली. त्यानंतर श्याम गायकवाड हा तेथे आला व गाव नमुना ८ बाबत प्रश्न विचारू लागला. यावेळी सचिव माळवे यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे नमुना ८ बाबत पूर्ण रेकोर्ड दाखविला. परंतू श्याम गायकवाड हा गावातील शंकर गायकवाड यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर कब्जा करून वास्तव्यास आहे. ज्या ठिकाणी आज रोजी राहतो. त्या जागेचा नमुना ८ स्वतःच्या नावाने करून द्या, असा हट्ट श्यामने धरल्याने सचिव आत्माराम माळवे यांनी पूर्ण न केल्याने श्याम गायकवाड यांनी स्वतःला चक्क ग्रामपंचायतमध्ये कोंडून घेतल्याची प्रतिक्रिया सचिव आत्माराम माळवे यांनी दिली.

श्याम गायकवाड यांच्या जागेच्या नोटरीची नोंद न घेतल्याने सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयात स्वतःला आतमध्ये दरवाज्याचा कोंडा लावून कोंबून घेतले. ही बाब श्यामची आई व पत्नीला कळाली. ग्रामपंचायतच्या आतमध्ये जोरजोराने आवाज देत रडू लागल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पांडुरंग फाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्याम हा आतमध्ये जमिनीवर टेबलखाली पडून दिसला. यावेळी श्याम गायकवाड बेशुद्ध अवस्थेत पडून होता.

त्याला तातडीने दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.या जागेबाबत न्यायालयात २०२० पासून प्रकरण सुरू असून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सचिव माळवे यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायत सचिव आत्माराम माळवे यांची पोलिसांत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया दि. ६ एप्रिल २०२२ रोजी सुरू होती.

अन् ग्रामसेवकाने मला कोंढले
जुन्या नमुना आठ वर तत्कालीन सरपंच व सचिवांच्या सह्या आहे. परंतु त्या खोडलेल्या आहे.याबाबत माळवे यांना माहिती विचारली असता, याबाबत कोणतीही माहिती नाही, असे सांगितले. ग्रामसभा झाल्यानंतर माळवे कडी लावून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी मला बाहेर काढले.
श्याम गायकवाड, रहिवासी ईसापूर.

बातम्या आणखी आहेत...