आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणी:नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केली जाणार मतदार नोंदणी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशात अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३३ हजार २४९ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. आता पुरवणी मतदार यादीच्या दृष्टीने नोंदणी केली जाणार आहे. नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही नोंदणी केली जाणार आहे.

दरवेळी पेक्षा यंदा पदवीधरांनी मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष केले. पहिल्या टप्प्यातील नांदणीमुळे निवडणूक आयोगाने नोंदणीकरिता मुदतवाढ दिली. जिल्हा प्रशासनाला सुद्धा मतदार नोंदणी वाढावी ह्यासाठी तंबी दिली होती. तद्नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदार नोंदणीत सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या टप्प्यात पदवीधर मतदार नोंदणीला गती मिळाली. अंतीम यादी प्रसिद्ध होईपर्यंत ३३ हजार २४९ मतदारांनी नोंदणी केली.

जिल्ह्यात इच्छूक उमेदवारांचा प्रचार सुरू
निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत अनेक इच्छूक गुडघ्याला बाशींग बांधून बसले आहे. अनेकांनी अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला आहे. यंदा खरी लढत भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये होणार आहे. भाजपाच्या उमेदवारावर जवळपास शिक्का मोर्तब झाला, परंतू महाविकास आघाडीकडून विविध नावे चर्चेत आहेत. यात नेमकी कुणाच्या खांद्यावर जबाबदारी सोपवल्या जाईल, ही येणारी वेळच सांगेल.

बातम्या आणखी आहेत...