आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभाराची चावी:मतदारांनी जुन्या, नवख्यांच्या हाती दिली ग्रा. पं.च्या कारभाराची चावी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ९३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. यात काही जुन्या, तर काही नव्या उमेदवारांच्या हातात ग्रामपंचायतीची चावी आली आहे. सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी शांततेत पार पडली असून, विजयानंतर उमेदवारांनी गुलाल उधळून ढोल, ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत १०० ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार होती. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. यात ७ ग्रा. पं.चे सरपंच आणि १२७ सदस्य अविरोध निवडून आले. दरम्यान, पुसद तालुक्यातील १०, आर्णी ७, झरीजामणी ४, मारेगाव ९, उमरखेड ४, दारव्हा ८, घाटंजी ४, यवतमाळ १५, राळेगाव ८, दिग्रस ५, वणी १७, बाभुळगाव, नेर प्रत्येकी एक, अशा एकूण ९३ ग्रामपंचायतीतील ३०८ प्रभागासाठी रविवार, १८ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ९३ सरपंच आणि ६४९ सदस्य निवडीसाठी ८३२३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सरपंचपदाचा उमेदवार विजयी, तर पॅनल पराभूत यंदा सरपंचाची निवड मतदारांमधून करण्यात येणार होती. त्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी सरपंच पदाचा उमेदवार तगडा होता. त्याच उमेदवाराचे पॅनलसुद्धा निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत होते. सरपंच पदाच्या उमेदवाराच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. परंतु पॅनलमधील अनेक उमेदवारांना मतदारांनी पसंती दिलीच नाही.

भाजप अव्वल, तर काँग्रेस राहिली दुसऱ्या स्थानी यंदा सरपंचाची जनतेतून निवड झाली. त्यात ३० जागा घेऊन भाजप अव्वल, तर दुसऱ्या क्रमांकावर २१ जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या. राष्ट्रवादी १५, शिंदे गट १२, ठाकरे गट १०, मनसे एक आणि इतर सरपंच १० ग्रा. पं.त निवडून आले. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी आमच्याच जागा जास्त असल्याचा कित्ता गिरवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

एक मताने वारगावातील उमेदवार झाला विजयी वणी तालुक्यातील वारगाव ग्रा.पं.तील रूख्माबाई पिंपळकर आणि वंदना चिकनकर यांच्यात चुरशीची लढत झाली. यात वंदना चिकनकर यांना १४२, तर प्रतिस्पर्धी रूख्माबाई पिंपळकर यांना १४३ मते पडली. यात रूख्माबाईं एक मताने विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...