आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:विद्यापीठाच्या सिनेटसाठी 15  केंद्रांवर आज मतदान

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सिनेटची निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत आलेली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे पदाधिकारीही सहभागी झाले असल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या सिनेट निवडणुकीसाठी रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १५ ठिकाणी मतदान केंद्रे देण्यात आलेली आहेत.

सिनेट २०२२ च्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. सिनेटच्या निवडणुकीत तब्बल २०६ उमेदवार रिंगणात आहेत. दरवर्षी शिक्षक संघटनांचा या निवडणुकीत जोर असतो. त्यासाठी त्यांची तयारीही सुरू असते. मात्र यंदा विद्यापीठ निवडणुकीच्या रिंगणात राजकीय मैदान गाजवणारे काही नेते आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा या निवडणुकीकडे लागलेल्या आहेत.मतदानासाठी यंदा जिल्ह्यात १५ केंद्रे निश्‍चित करण्यात आलेली आहेत.

त्यात यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, वणी येथे लोकनायक टिळक महाविद्यालय, पुसद येथे फुलसिंग नाईक महाविद्यालय, दिग्रस येथे बापुरावजी कला, वाणिज्य महाविद्यालय, नेर येथे नेहरू कला, वाणिज्य महाविद्यालय, उमरखेडसाठी गोपीकाबाई गावंडे महाविद्यालय, घाटंजी मध्ये एस.पी.एम. सायन्स महाविद्यालय, पांढरकवडा येथे बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, दारव्हा येथे मुंगसाजी महाराज महाविद्यालय, कळंब येथे इंदिरा महाविद्यालय, आर्णी येथे रामराव भारती महाविद्यालय, सवना येथे श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यायल, बाभुळगाव येथे शिवशक्ती महाविद्यालय, राळेगाव येथे कला, वाणिज्य महाविद्यालय राळेगाव व बोरी अरब येथे कला, वाणिज्य महाविद्यालचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...