आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी वाळके

ढाणकी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी बंटी वाळके तर उपाध्यक्षपदी इबादुल्ला खा पठाण यांची बिनविरोध निवड झाली.

नुकत्याच पार पडलेल्या ढाणकी ग्राम विविध सहकारी सोसायटीच्या तेरा संचालक पदाच्या निवडणुकीत १३ जागेवर विजय मिळवला होता. बुधवार, दि. १५ जून रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. अध्यक्षपदासाठी बंटी वाळके आणि उपाध्यक्षपदासाठी इबादुल्ला खा पठाण यांचे नामांकन दाखल असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपाध्यक्ष पदासाठी तीन संचालक उत्सुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी इच्छुक बंटी वाळके नावावर शिक्कामोर्तब केला.

यावेळी संचालक राहुल चंद्रे, विठ्ठल उपेवाड, शिवाजी वैद्य, देवराव राठोड, अनिल राठोड, गजानन पाटील गाडेकर, पंकज शेषराव नरवाडे, लक्ष्‍मीबाई मारोती गुडेटवार, जयश्री विनय कोडगीरवार, तुळशीराम गायकवाड इत्यादी सोसायटी चे संचालक उपस्थित होते. या निवडीने शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

बातम्या आणखी आहेत...