आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम जयंती:वारकरी, गुरुदेव मंडळांनी राष्ट्रसंतांचे मौलिक विचार समाजापर्यंत पोहोचवावे; मंगरूळ येथे प्रा. डॉ अनंतकुमार सूर्यकार यांचे प्रतिपादन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा केंद्रबिंदू मुळातच गाव आहे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा, येईल देशा असे राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. गाव सुखी तर जग सुखी ह्या विचारधारेने गाव जगले पाहिजे. सद्यस्थितीत गावे सुधारत आहेत परंतु वाईट वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरूणाई व्यसनाधीन होते आहे. गाव पुढारी गावातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आणि विविध प्रलोभने व आमिष दाखवून त्यांना देशोधडीला लावत आहेत. याकरिता गुरुदेव सेवा मंडळ व वारकरी संप्रदायाच्या समन्वयातून जनतेला अज्ञानातून व व्यसनाधीन कुवृत्तीतून काढण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक व यवतमाळ तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे संघटक प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगानुरूप केले.

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ तरोडा ग्रामवासीयातर्फे विश्ववंदनीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. टाळ मृदंगांच्या गजरात रथावर आरूढ राष्ट्रसंतांच्या प्रतिमेसह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, संत सेवालाल समाज मंडळ, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा समाज मंडळ, पंचशील समाज मंडळ, संतश्रेष्ठ भिमा भोई समाज मंडळ, संतश्रेष्ठ संताजी जगनाडे तैलिक समाज संघ, शिव जयंती उत्सव समिती, गजानन महाराज महिला भजन मंडळ, बालिका लेझीम मंडळ व गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ सहभागी झाले होते. विठ्ठल गजर व राष्ट्रसंतांच्या गजर, भजनांनी गाव निनादून गेले. रस्त्यांनी, गल्ली बोळीतून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मारोती मंदिर, आठवडी बाजार मंगरूळ, येथे ग्राम जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रथम विश्वधर्म सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गावातील पुरुष, महिला, तरूण, तरूणी व बाल मंडळी सहभागी झाली होती. प्रार्थनेनंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विठ्ठल कोडापे, संजय कांबळे, मोहन ठाकरे, ज्ञानेश्वर कोडापे, महादेव तुमडाम, रामेश्वर गावंडे, गणेश सोनोने, विजय ढोके, गणेश जोगे, सुनील गिरपुंजे, वसंत वनवे, नारायण सूर्यकार, प्रमोद पवार, रूपेश चव्हाण, बाळू महल्ले, दिलीप मोडले, पार्थ ठाकरे, कांता मोडले, राधा मोडले यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...