आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कान्होबा देवस्थानला वॉटर कुलर भेट; आईच्या वाढदिवसानिमित्त संजय देशमुख यांचा उपक्रम

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राज्यमंत्री संजय देशमुख व ईश्वर फाउंडेशन संयोजिका वैशाली देशमुख यांनी आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील चिंचोली येथील कान्होबा देवस्थान येथे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर देऊन आपल्या आईचा वाढदिवस सामाजिक अभिनव कार्याने साजरा केल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

माजी मंत्री संजय देशमुख यांच्या आई सविताताई देशमुख यांचा ७६ व्या वाढदिवसानिमित्त केक व इतर कोणताच वायफळ खर्च न करता जनतेच्या हितकारक उपक्रम राबवण्याचा संकल्प या दाम्पत्याने केला. त्याअनुषंगाने तालुक्यातील चिंचोली क्र. २ येथील कान्होबा देवस्थानाला आईच्या वाढदिवशी वॉटर कुलर देऊन भाविक भक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाल्याचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या सविता देशमुख यांचा आपला मुलगा, सुनबाई व नातवंडांनी ७६ वा वाढदिवस भाविक भक्तांची तहान भागविण्यासाठी वॉटर कुलर देऊन सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केल्याने वाढदिवशी खूप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. या सामाजिक अभिनव उपक्रमात सविता देशमुख यांचे सुपुत्र माजी मंत्री संजय देशमुख, सुन वैशाली देशमुख, मुली योगिता, संगीता तसेच नातू पृथ्वीराज व नात साक्षी यांनी वाढदिवसानिमित्त वॉटर कूलर जनतेसाठी उपलब्ध करून दिला. याप्रसंगी नातेवाईक स्नेही जण व इतरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...