आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा विसर्ग:चार प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू; अडाण नदीला पूर

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी, जिल्ह्यातील जलाशयात वाढ झाल्याने अडाण, अधर पूस, बेंबळा, ईसापूर आदी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळून जाणाऱ्या अडाण नदीला पूर आला असून, दारव्हा-यवतमाळ मार्ग १८ तासापासून रस्ता पूर्णत: बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहे. शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी दिवसभर कडक उन्ह होते, परंतू सायंकाळी साडेपाच वाजता रिमझिम पावसाने हजेरी लावली.

दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ६९.५९ टक्के आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत जलाशयाची पाणी पातळी ८०.१० टक्क्यापर्यंत भरावयाचा आहे. नदी पात्रात धरणाचे एकुण ५ दरवाजे २० सेमीने उघडुन विसर्ग १०२.९२ घमी, तर तीन दरवाजे ५० सेमी, दोन दरवाजे ४० सेमीने उघडुन विसर्ग २३४.९८ घमी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अडाण नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून, बोरीअरब येथील नदीच्या पुलावरून पुराचे पाणी जात आहे. अशा परिस्थिती मध्यरात्री पासून यवतमाळ-दारव्हा मार्ग बंद आहे. त्याचप्रमाणे अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेमी करण्यात येत असून, ५२ क्यूमेकचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. पातळी नियंत्रणात ठेवण्याकरता ४ दरवाजे उघडण्यात आले असून, १०० घमीने विसर्ग सुरु आहे. इसापूर धरणाची गेट क्रमांक सहा, आणि दहा हे दोन गेट ५० सेंटीमिटरने उघडण्यात आले होते.साय.७ वाजता बंद करण्यात आले.

वर्धा नदी पात्रात विसर्ग
धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या जलाशयाची पाणी पातळी २८२.७१ (७०.२१ टक्के) एव्हढी आहे. त्यामुळे निम्न वर्धा धरणाच्या सात गेट ३० सेमी उघडण्यात आले असून, १८५.७४ घमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोनचे उपविभागीय अभियंत्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...