आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण‎ टंचाई:पाणीपुरवठा बंद; नागरिकांची ‘मजीप्रा’वर धडक‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चांदोरेनगर परिसराचा‎ पाणीपुरवठा बारा दिवसापासून‎ खंडित असल्यामुळे प्रभागातील‎ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल‎ होत आहे. सोमवार, ३ एप्रिल रोजी‎ प्रभागातील संतप्त नागरिकांनी‎ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण‎ कार्यालयावर धडक देऊन चांदोरे‎ नगर येथील नवीन टाकीतून‎ पाणीपुरवठा सुरू करून‎ पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा‎ या मागणीचे निवेदन कार्यकारी‎ अभियंत्यांना दिले.‎ धामणगाव रोडवरील चांदोरे नगर‎ येथे बारा दिवसापासून पाणीपुरवठा‎ होत नसल्याने नागरिकांची भर‎ उन्हात पाण्यासाठी लाही-लाही होत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. तर काही भागात अनेक‎ महिन्यांपासून पाणीच पोहोचत नाही.‎ मजीप्राचे प्रशासनाचे प्रभागात‎ पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याचा‎ आरोप नागरिकांनी केला. संबंधित‎ अधिकाऱ्यांना वारंवार प्रयत्न‎ करूनही योग्य उत्तर मिळत नाही.‎‎

त्यामुळे प्रभागातील संतप्त‎ नागरिकांनी जीवन प्राधिकरण‎ कार्यालयावर धडक देऊन प्रभागात‎ पाणी पुरवठा करण्यात यावा, तसेच‎ ‘अमृत’ योजनेमध्ये तयार झालेल्या‎ बऱ्याच टाक्यांमधून पाणीपुरवठा‎ सुरू झालेला आहे. परंतू‎ चांदोरेनगरातील टाकीतून अद्याप‎ पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. तो‎ सुरू झाल्यास चांदोरेनगर व‎ परिसरातील रहिवाशांना योग्य‎ दाबाने व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा‎ होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने‎ टाकीतून पाणीपुरवठा सुरू करून‎ परिसरातील नागरिकांना भीषण‎ टंचाईतून मुक्त करावे, या मागणीचे‎ निवेदन नागरिकांनी कार्यकारी‎ अभियंत्यांना दिले. यावेळी विजय‎ खडसे, श्रीकृष्ण कांबळे, किशोर‎ बडे, नंदकुमार महाजन, उमेश‎ घोडेस्वार, सचिन बनसोड, रमेश‎ जयस्वाल, राधा फुंदे, विश्वनाथ‎ कोसेकर, श्रीकृष्ण पंडीत, धनराज‎ सानप, नारायण उईके, संगीता‎ बागडे, गजानन धापेकर, दशरथ‎ बोरकर, आदी उपस्थित होते.‎