आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणीसेवा:श्रमदानातून तयार केले वन्य प्राण्यांसाठी पाणवठे

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे महिन्यात उन्हाची दाहकता लक्षात घेता व एप्रिल हिटमुळे वन परिक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटत असल्यामुळे वन्य प्राण्यांची शहराकडे धाव मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. वनपरिक्षेत्रात नैसर्गिक स्त्रोत देखील आटू लागले असल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन्य प्राण्यांची भटकंती थांबवण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नियोजनाने रविवार, दि. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्रमदानातून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम पत्रिकेतील नियोजित रूपरेषा प्रमाणे पुसद वनपरिक्षेत्र अंतर्गत बेलगव्हाण नियत क्षेत्र येथे वन्यजीवाकरिता श्रमदानातून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. मे महिन्यामध्ये सर्वत्र उन्हाळा जाणवतो, तसेच हे महिन्यातच नैसर्गिक पाण्याचे स्रोत सुद्धा कमी होतात. त्यामुळे वन्य प्राण्याकरिता वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यांची अत्यावश्यक गरज निर्माण होते. त्याकरिता बापूजी आणि स्मृती वन उद्यानातून अंदाजे अडीच मीटर पाइप लाइनच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्णवेळ पाणी उपलब्ध राहणार आहे. सदर पाणवठ्याच्या श्रमदान वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाय्यक ठाकरे,वन रक्षक जितकर, वनमजूर परसराम कऱ्हाळे व इतर लोकांच्या मदतीने पाणवठा पूर्ण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...